Hailstorm  Agrowon
हवामान

Weather Update : पूर्व विदर्भात आज गारपिटीचा इशारा

Hailstorm Update : आज (ता. १७) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १७) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

उत्तर ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच, मराठवाड्यापासून कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा पोषक हवामान होत आहे. आज (ता. १७) पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीची शक्यता आहे.

शनिवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर, वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर यवतमाळ, चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे पारा ३९ अंशांपार कायम आहे. ढगाळ हवामान होत असल्याने उन्हाच्या चटक्यासह उकाडा कायम आहे. पुढील काळात उन्हाची ताप आणखी वाढत जाणार आहे.

शनिवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.१, धुळे ३५.५, जळगाव ३६.६, कोल्हापूर ३५.७, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ३०.१, नाशिक ३३.७, निफाड ३३.५, सांगली ३६.७, सातारा ३६.२, सोलापूर ३९.६, सांताक्रूझ ३०.४, डहाणू ३०, रत्नागिरी ३१.३,

छत्रपती संभाजीनगर ३४.८, नांदेड ३७.२, परभणी ३७.४, अकोला ३८.०, अमरावती ३५.२, बुलडाणा ३५.५, ब्रह्मपुरी ३९.२, चंद्रपूर ३९.४, गडचिरोली ३६.८, गोंदिया ३६.८, नागपूर ३६.७, वर्धा ३८.०, वाशीम ३९.६, यवतमाळ ३९.५.

३९ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३९.६, वाशीम ३९.६, यवतमाळ ३९.५, चंद्रपूर ३९.४, ब्रह्मपुरी ३९.२.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नागपूर, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT