Hailstorm  Agrowon
हवामान

Weather Forecast : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा

Hailstorm Update : काही दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे.

Team Agrowon

Unseasonal Rain News : काही दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पुन्हा वादळी पावसाला (Rain Forecast) पोषक हवामान झाले आहे. आज (ता. २५) राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (Rain Prediction) आहे.

तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट (Hailstorm Forecast) होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दक्षिण तामिळनाडू आणि परिसरावर देखील ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेशपासून, महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूतील चक्राकार वाऱ्यांपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज (ता. २५) विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव येथे गारपीट आणि वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि नगर येथे ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित राज्यातही जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात कमाल तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३४ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३६.१ (१८.९), जळगाव ३९.० (२२.३), कोल्हापूर ३५.२ (२१.१), महाबळेश्वर ३०.५ (१६.९), नाशिक ३४.८ (१७.३),

निफाड ३७.२ (१८.५), सांगली ३६.७ (२२.१), सातारा ३५.८ (२०.२), सोलापूर ३८.० (२२.९), सांताक्रूझ ३२.० (२४.०), डहाणू ३३.१ (२४.५), रत्नागिरी ३३.१ (२५.०),

छत्रपती संभाजीनगर ३६.२ (२०.७), नांदेड (२४.४), परभणी ३६.४ (२२.५), अकोला ३८.३ (२२.०), अमरावती ३७.० (२१.०), बुलढाणा ३६.२ (२३.४), ब्रह्मपुरी ३७.८ (२२.५),

चंद्रपूर ३८.२ (२१.८), गडचिरोली ३७.६(२२.०), गोंदिया ३५.५ (२२.४), नागपूर ३५.३ (२२.४), वर्धा ३७.० (२२.०), यवतमाळ ३६.५ (२२.०).

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बीड, धाराशिव.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

पुणे, नगर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : धुळे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT