Hailstorm Agrowon
हवामान

Hailstorm Forecast : विदर्भात गारपिटीचा इशारा

Weather Update : आज (ता. २२) विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : उन्हाचा चटका असह्य होत आहे. त्यात राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच आहे. आज (ता. २२) विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाण्यात उष्ण हवामानाचा इशारा असून, राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असून, शनिवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आज विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे.

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वाशीम येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे तापमान ४३ अंशांवर आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सातत्याने ४२ अंशांपार आहे.

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.२, नगर ३९.८, धुळे ४२.०, जळगाव ४१.४, कोल्हापूर ३४.०, महाबळेश्वर ३१.१, मालेगाव ४१.६, नाशिक ३७.७, निफाड ३७.३, सांगली ३३.१, सातारा ३८.०, सोलापूर ३९.६, सांताक्रूझ ३५.४, डहाणू ३४.८, रत्नागिरी ३२.५,

छत्रपती संभाजीनगर ४०.२, बीड ४०.७, नांदेड ३८.६, परभणी ४२.१, अकोला ४३.०, अमरावती ४१.६, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४२.०, चंद्रपूर ४१.४, गडचिरोली ४०.७, गोंदिया ४०.७, नागपूर ४०.२, वर्धा ४२.५, वाशीम ४३.२, यवतमाळ ४१.७.

- उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई.

- वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ.

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, धाराशिव, बीड लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

वाशीम ४३.२, अकोला ४३.०, वर्धा ४२.५, परभणी ४२.१, धुळे ४२, ब्रह्मपुरी ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT