Weekly Weather : राज्यात अल्प पावसाची शक्यता

Weather Update : राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. पूर्व विदर्भात मात्र वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.
Agriculture Weather
Agriculture Weather Agrowon

Agriculture Weather : महाराष्ट्रावर या आठवडाभर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. भारतावरही तितकाच कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी भागांत आकाश ढगाळ राहील. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. पूर्व विदर्भात मात्र वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.

त्यामुळेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम व पूर्व विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रातही अल्पशा पावसाची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, मध्य विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात दुपारची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्‍चिम महाराष्ट्रात कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानात ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील. बाष्पीभवनाचा वेग वाढेल.

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके वाढेल. त्यातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढग निर्मिती होईल. वारे विशेषतः पूर्व विदर्भात नैॡत्येकडून वाहण्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून नेतील. त्यामुळे ढगनिर्मिती होऊन पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल.

तसेच वायव्येकडून बाष्प वाहून आणणारे वारे अतिथंड राहण्यामुळे काही भागांत गारपिटीची शक्यता निर्माण होईल. प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान १८ ते २५ अंश सेल्सिअस असल्यामुळे ‘ला निना’ची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी मॉन्सून काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणे शक्य आहे.

कोकण

कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्यामुळे पावसाची शक्यता राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता पालघर जिल्ह्यात ८० टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत ७० ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ ते २८ टक्के, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व पालघर जिल्ह्यांत ८ ते ९ कि.मी., तर उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

Agriculture Weather
Weather Update : वादळी वारे अन् विजांसह पावसाचा हवामान विभागाचा इशारा

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, नंदुरबार जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३३ ते ४२ टक्के, तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ५२ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेगात वाढ होऊन तो ताशी १५ ते १७ कि.मी. राहील. नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव या सर्वच जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा

आज व उद्या (ता.२१, २२) धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात वाढ होईल. किमान तापमान बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर व जालना जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअश राहील.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ३८ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३१ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २१ ते २८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे १५ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत १६ ते १८ कि.मी., बीड जिल्ह्यात ताशी १५ कि.मी. व उर्वरित जिल्ह्यांत ताशी १० ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

आज व उद्या (ता.२१, २२) बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आज व उद्या (ता.२१, २२) पावसाची शक्यता आहे.

Agriculture Weather
Rain News : राज्यात आजही पावसाची शक्यता; उष्णतेचा पारा वाढला

पूर्व विदर्भ

कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ५१ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्यात ४९ टक्के, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० ते ४० टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आज व उद्या (ता.२१, २२) १.८ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिसअस, सांगली जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस तर पुणे, नगर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि पुणे व नगर जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांत ५० ते ६३ टक्के तर सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३५ ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १७ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नगर जिल्ह्यात ताशी १८ कि.मी. तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी १० ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सोलापूर, पुणे, सातारा व नगर जिल्ह्यांत जिल्ह्यात आज व उद्या (ता.२१, २२) पावसाची शक्यता आहे.

कृषी सल्ला

द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची कामे पूर्ण करावीत.

ज्वारी, हरभरा, गहू पिकांची काढणी पावसाचा अंदाज घेऊन करावी.

फळबागांमध्ये ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन करावे.

फळझाडांवर केओलिन द्रावणाची फवारणी करावी.

जनावरांच्या गोठ्यात आणि कुक्कुटपालन शेडमध्ये तापमान नियंत्रित राखावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com