Rural Health Care : यवतमाळ मारेगाव तालुक्यातील २० हजार ९८४ पशुधनाची आरोग्यसेवा सध्या प्रभारी व्यवस्थेच्या भरवशावर आहे. सात पशुवैद्यकीय दवाखाने असताना दोन महत्त्वाच्या केंद्रांवर नियमित पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांची फरफट होत असल्याचा आरोप आहे..मारेगाव तालुक्यात मारेगाव, मार्डी, बोटोणी, कुंभा, वाघदरा, पेंढरी आणि हिवरा मजरा असे सात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, मार्डी आणि बोटोणी येथील दवाखान्यांमध्ये नियमित पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. बाहेरील तालुक्यातील अधिकाऱ्यांवर या केंद्रांचा कारभार सोपविण्यात आला असून, तेही आठवड्यातून केवळ तीन दिवस प्रभारासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी वेळ आणि अंतराचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले..Kurmar Community: कुरमार : कुरी पाळणारे भटके पशुपालक.तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे रिक्त असल्याने प्रत्यक्षात केवळ एका अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी आहे. याशिवाय पशुसंवर्धन विभागाचे प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे सहाय्यक आयुक्त पदही रिक्त आहे. वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर आहे. शिपायांची १० पदे मंजूर असताना सर्वच १० पदे रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली..Dharashiv Agriculture Department: धाराशिव जिल्ह्याचा अख्खा कृषी विभाग रिकामा.एकीकडे विभागाकडून जनावरांमधील पाय व तोंडखुरी आजाराविरोधातील प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे मनुष्यबळाअभावी नियमित पशुवैद्यकीय सेवा विस्कळित झाली आहे. आजाराची लक्षणे दिसल्यानंतर तातडीचा उपचार मिळणे पशुधनासाठी महत्त्वाचे असताना डॉक्टरच उपलब्ध नसल्याने पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहते. या पार्श्वभूमीवर रिक्त पदांचा अनुशेष दूर करून प्रभावी पशुवैद्यकीय सेवा देण्याची मागणी मारेगाव तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांनी केली आहे..शेतीपूरक उत्पन्नावर परिणाममारेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीपूरक उत्पन्न पशुधनावर अवलंबून आहे. जनावर आजारी पडल्यास किंवा उपचाराची गरज निर्माण झाल्यास नियमित डॉक्टर उपलब्ध नसणे थेट पशुपालकांच्या उत्पन्नावर परिणाम करणारे आहे. त्यामुळे केवळ प्रभारी व्यवस्था राबवून प्रश्न लांबविण्याऐवजी रिक्त पदे तातडीने भरावीत आणि सातही दवाखान्यांमध्ये नियमित पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी पशुपालक व शेतकऱ्यांकडून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.