Hail Warning Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

weather news : मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज

Team Agrowon

Hail Warning : पुणे : सूर्य आग ओकत असल्याने सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली त्रासदायक ठरत आहे. आज (ता. ८) मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह, विदर्भात गारपिटीसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

उन्हाचा चटका वाढल्याने मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.१ अंश तापमान नोंदले गेले. तर अकोला, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, बीड, जेऊर येथे ४३ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भापासून तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात उकाडा कायम असून, वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ८) मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा, तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, धुळे ४२, जळगाव ४२.२, जेऊर ४३.५, कोल्हापूर ३९.३, महाबळेश्‍वर ३१.८, मालेगाव ४२.६, नाशिक ३६.८, निफाड ३७.२, सांगली ४१.१, सातारा ४०, सोलापूर ४४.१, सांताक्रूझ ३३.३, डहाणू ३३.९, रत्नागिरी ३४.३, छत्रपती संभाजीनगर ४१.२, बीड ४३.२, नांदेड ४२.६, परभणी ४२.६, अकोला ४३.७, अमरावती ४३.२, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४४.१, चंद्रपूर ४३.६, गडचिरोली ४२, गोंदिया ४१.४, नागपूर ४२.६, वर्धा ४३.५, वाशीम ४३.४, यवतमाळ ४२.


वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा. (येलो अलर्ट) :
अमरावती, वर्धा, नागपूर

वादळी पावसाचा इशारा. (येलो अलर्ट) :
लातूर, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
सोलापूर ४४.१, ब्रह्मपुरी ४४.१, अकोला ४३.७, चंद्रपूर ४३.६, वर्धा ४३.५, जेऊर ४३.५, वाशीम ४३.४, बीड ४३.२, अमरावती ४३.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Smart Farming: स्मार्ट शेती : गरज, तंत्रज्ञान आणि भविष्य

Bhusar Market Closure: मार्केट यार्डातील भुसार बाजार २५ फेब्रुवारीला राहणार बंद

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

SCROLL FOR NEXT