Monsoon Agrowon
हवामान

Marathwada Monsoon 2025: मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस; राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाचा अंदाज

Monsoon Prediction 2025: महाराष्ट्रातील 2025 माॅन्सून हंगामासाठी हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिला आहे. त्यात विशेषत: मराठवाड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. तापमानातील वाढ असूनही, शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची आशा आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सून हंगाम २०२५ मध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. त्यातही मराठवड्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक आहे. मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भ आणि कोकणातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज (ता.१५) देशातील माॅन्सून हंगाम २०२५ म्हणजेच जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधितील दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी देशातील माॅन्सूनचा अंदाज जाहीर केला. देशात यंदा माॅन्सूनला पोषक स्थिती राहील. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला. देशात माॅन्सून २०२५ मध्ये सरासरीच्या तुलनेत १०५ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला.

२०२५ मध्य जानेवारीपासूनच तापमान नविन विक्रम करत आहे. एप्रिल आणि मे महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज आहे. तापमानात वाढ झाल्याने माॅन्सून नेमका कसा राहील? याची चिंता शेतकऱ्यांमध्ये होती. पण हवामान विभागाने आज सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. राज्यात यंदा माॅन्सून चांगला बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यभरातच यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्त पावसाची शक्यता अधिक आहे. विदर्भालगचे जिल्हे वगळता मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक आहे. तर खानदेशातील काही भागातही सरारीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. 

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. कोकणातही यंदा चांगला पावसाळा राहणार आहे. किनारपट्टी भागात पावसाचे प्रमाण काहीसे अधिक राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतके म्हणजेच तटस्थ राहण्याचा अंदाज आहे. तर आयओडीही तटस्थ राहील. तसेच उत्तर गोलार्धात युरेशियामध्ये हीम आच्छादनाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी आहे. ही स्थिती माॅन्सूनसाठी पोषक आहे. त्यामुळे देशात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy Challenges: गेवराईतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कसे?

Bihar Election 2025: संकेत आणि संदेश

Interview with Dr Subhas Puri: कृषी विद्यापीठांमध्ये आमूलाग्र बदलांची आवश्यकता

Digital Literacy: यू-ट्यूबर विरुद्ध अंतराळवीर : बदललेली स्वप्ने

Lemon Disease: लिंबूवर्गीय पिकावरील सिट्रस कॅंकर

SCROLL FOR NEXT