Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : खूशखबर....माॅन्सून ५ दिवसांत केरळात येणार; माॅन्सूनसाठी पोषक हवामान; वाटचाल सुरुच राहणार

Weather Update : पुढील ५ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात पुढील आज आणि उद्या दिवस काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनची वाट पाहणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात पुढील आज आणि उद्या दिवस काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

माॅन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने आज खूषखबर दिली. हवामान विभागाने आज स्पष्ट केले की, माॅन्सून पुढील ५ दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होईल. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील ५ दिवस माॅन्सून दक्षिण अरबी समुद्र, उर्वरित मालदीव आणि कोमोरीन भाग, लक्षद्वीपचा आणखी काही भाग, केरळ, आग्नेय आणि मध्य बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील काही भाग व्यापे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने काल म्हणजेच रविवारी श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात काही भागांमध्ये प्रगती केली होती. पण आज माॅन्सूनने याच भागात मुक्काम केला. मात्र माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून माॅन्सूनची वाटचाल कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा आणि उष्णतेच्या लाटेचाही इशारा दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावाती, नागपूर जिल्ह्यात काही ठिाकणी वादळी पावसाचा अंदाज दिला. 

तसेच हवामान विभागाने आज अकोला, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर उद्या अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णेतच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT