Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Rain : पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता

Weather News : हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतरही भागात पुढील तीन दिवसांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात अनेक भागात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असला तरी त्याचे स्वरुप सर्वदूर नाही. पण हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतरही भागात पुढील तीन दिवसांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड़ अलर्ट दिला. तर सातारा जिल्ह्यात घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. मात्र सपाट भुभाावर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज दिला.

सोबत कोकणातील सिधुदूर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला.

उद्या म्हणजेच रविवारी कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. पणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

सोमवारी आणि मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर विदर्भातील संपूर्ण जिल्हे, मराठवाड्यातील पूर्ण जिल्हे तसेच खानदेशातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT