Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला आहे. सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला असून, मॉन्सूनचा पाऊस हळूहळू जोर धरण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला आहे. सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला असून, मॉन्सूनचा पाऊस हळूहळू जोर धरण्याची शक्यता आहे. दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला असला तरी उर्वरित महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे. आज (ता. ८) सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

सौराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती सक्रिय आहे. मॉन्सून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात दाखल झाला असतानाच, उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी कायम आहे. ढगाळ हवामान, पावसाच्या हजेरीने राज्याच्या कमाल तापमान कमी-अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चाकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात उकाडा कायम असून, दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. आज (ता. ८) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे, तर उर्वरित राज्यात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. ढगाळ हवामान व उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मॉन्सूनची वाटचाल जैसे थे

पुणे : तीव्र उन्हाळा, प्रचंड उकाडा, पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा असलेला मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गुरूवारी (ता. ६) नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमध्ये मजल मारली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा शुक्रवारी (ता. ७) कायम होती. दोन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

चिपळूण १००, संगमेश्वर ७०, वैभववाडी, देवगड प्रत्येकी ६०, लांजा, रत्नागिरी प्रत्येकी ५०, सावंतवाडी ३०, मालवण, गुहागर, कुडाळ, दापोली प्रत्येकी २०,

मध्य महाराष्ट्र :

पंढरपूर १३०, जेऊर ९०, दौंड ७०, संगमनेर ६०, गडहिंग्लज, खंडाळा, जामखेड, कराड प्रत्येकी ४०, इंदापूर, पाडेगाव, बारामती, संख, जत प्रत्येकी ३०, कवठे महांकाळ, पाटण, घोडेगाव, गगनबावडा, खटाव, तासगाव, शिराळा प्रत्येकी २०.

मराठवाडा :

औसा ५०, हादगाव ४०, उदगीर, पाटोदा, मानवत, उमरगा, परतूर प्रत्येकी ३०, सेलू, बीड, देवणी, भूम, मंथा, धाराशिव, रेणापूर, वाशी प्रत्येकी २०.

विदर्भ :

जेवती ७०, सिरोंचा, दिग्रस, मालेगाव, सेलू, राजूरा प्रत्येकी २०.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, सातारा.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : मंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT