Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

पावसाने काहीशी उघडीप देताच, कमी झालेले कमाल तापमान पुन्हा वाढू लागले आहे. यातच राज्यात वादळी पावसाचे सावट कायम आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : पावसाने काहीशी उघडीप देताच, कमी झालेले कमाल तापमान पुन्हा वाढू लागले आहे. यातच राज्यात वादळी पावसाचे सावट (Rain Forecast) कायम आहे. आज (ता. २) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही हलक्या पावसाचा अंदाज कायम असल्याने हवामान विभागाने (Weather Department) म्हटले आहे.

पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे गेले काही दिवस राज्याच्या कमाल तापमानात घट झाली. विदर्भात कमाल तापमान ३० अंशांच्या खाली घसरले होते. मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे.

सांगली येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून मराठवाडा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

आज (ता. ३) विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.४ (१८.९), जळगाव ३४.५ (२२.३), कोल्हापूर ३५.० (२१.२), महाबळेश्वर २८.० (१४.५), नाशिक २९.५(१९.६),

निफाड ३१.० (१९.५), सांगली ३६.५ (२०.२), सातारा ३४.५ (१८.२), सोलापूर ३६.१ (२२.६), सांताक्रूझ ३२.४ (२५.३), डहाणू ३२.४ (२४.०), रत्नागिरी ३३.४ (२३.९),

छत्रपती संभाजीनगर ३२.० (२०.४), नांदेड ३१.६ (२१.८), धाराशिव ३४.१ (२१.०), परभणी ३३.६ (२०.९), अकोला ३३.३ (२२.२), अमरावती ३१.८(१९.१), बुलढाणा ३१.० (२१.५), ब्रह्मपूरी ३३.० (२१.४),

गडचिरोली ३२.०(२०.८), गोंदिया ३३.० (२०.२), नागपूर ३१.७ (२१.५), वर्धा ३२.०(२२.८), वाशीम ३१.४ (२१.०), यवतमाळ ३२.० (२१.०).

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत

बंगालच्या उपसागराच्या अग्नेय भागात शनिवारपर्यंत (ता. ६) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे या भागात सोमवारपर्यंत (ता. ८) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर.

मराठवाडा : परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT