Rain Prediction
Rain Prediction Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

Team Agrowon

Weather Update Pune राज्याच्या विविध भागात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने (Hailstorm) हजेरी लावल्याने कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. आज (ता. १) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

उर्वरित राज्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे गेले काही दिवस राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. उन्हाच्या झळा आणि उकाडा अनुभवायला मिळत असल्या तरी, कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर आला आहे.

रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे. तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण अरबी समुद्रातील मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्व विदर्भापासून, तेलंगणा, कर्नाटक, अंतर्गत तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

आज (ता. १) विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.८ (१९.०), जळगाव - (१८.३), कोल्हापूर ३४.७ (२३.१), महाबळेश्वर २७.९ (१५.०), नाशिक ३४.०(१९.०),

निफाड ३८.१ (१७.६), सांगली ३६.१ (२३.१), सातारा ३३.८ (२०.७), सोलापूर ३४.६ (२२.२), सांताक्रूझ ३१.५ (१९.८), डहाणू ३२.३ (२५.८), रत्नागिरी ३२.९ (२४.२),

छत्रपती संभाजीनगर ३१.५ (१९.८), नांदेड ३४.४ (२०.६), धाराशिव - (१७.८), परभणी ३३.५ (२१.४), अकोला ३२.९ (१९.१), अमरावती ३१.४(१६.५), बुलढाणा २७.६ (१९.०), ब्रह्मपूरी ३६.० (१९.३),

चंद्रपूर ३७.० (-), गडचिरोली ३५.८(२१.०), गोंदिया ३६.० (१९.२), नागपूर ३३.९ (१८.९), वर्धा ३३.५(१९.५), यवतमाळ ३५.० (१७.५).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : नाशिक, नगर, सोलापूर.

मराठवाडा : जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT