Weather News Agrowon
हवामान

Weather Report : कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम

Weather Forecast : उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. मात्र, उर्वरित राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम आहे.

Team Agrowon

IMD Update : किमान तापमानाचा पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. तर उर्वरित राज्यात गारठा वाढत असला तरी अद्यापही गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता. १७) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर श्रीलंकेजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे बंगालच्या उपसागरासह दक्षिण भारताच्या पूर्व किनारपट्टीलगत ढगांची दाटी झाली आहे.

यातच राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहे. कोकणात कमाल तापमान हळूहळू कमी होऊ लागले आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा पुन्हा १४ अंशांच्या खाली घसरला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात थंडी परतली असतानाच, उर्वरित राज्यातही गारठा वाढू लागला आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. गुरुवारी (ता. १६) पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली. आज (ता. १७) या प्रणालीचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.

या प्रणालीचे केंद्र आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनमपासून ३९० किलोमीटर पूर्वेकडे, तर ओडिशाच्या परादीपपासून ३२० किलोमीटर आग्नेयेकडे, तर पश्चिम बंगालच्या दिघा बेटापासून नैर्ऋत्येकडे ४६० किलोमीटर अंतरावर होते. आज (ता. १७) उपसागरात चक्रीवादळ घोंघावणार आहे. हे चक्रीवादळ मोंगला आणि खेपूपारा लगत बांगलादेशाच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१४.२), जळगाव ३१.२ (१४.४), कोल्हापूर २९.७ (१८.५), महाबळेश्वर २५.० (१४.९), नाशिक ३१.४ (१४.२), निफाड ३२.० (१२.२), सांगली ३०.० (१७.८), सातारा ३०.८ (१५.०), सोलापूर ३३.६(१८.२), सांताक्रूझ ३५.९ (२१.६), डहाणू ३५.८ (२१.०), रत्नागिरी ३४.८ (२१.४), छत्रपती संभाजीनगर ३१.६ (१३.४), नांदेड ३१.२ (१५.०), परभणी ३१.९ (१६.०), अकोला ३३.६ (१७.४), अमरावती ३२.० (१७.८), बुलडाणा ३१.५ (१६.२), ब्रह्मपुरी ३२.४ (१७.०), चंद्रपूर ३१.८(१६.८), गडचिरोली ३१.६ (१६.४), गोंदिया ३०.२ (१५.६), नागपूर ३१.२(१५.८), वर्धा ३१.०(१७.५), वाशीम ३३.४(१६.६) यवतमाळ ३१.५ (१५.०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women in Agriculture : पुसा येथे जागतिक शेतकरी महिला परिषदेचे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

India Exports To China: भारताची चीनमध्ये निर्यात ३३ टक्क्यांनी वाढली, शेतमाल, सागरी उत्पादनांचा समावेश

Agriculture Exhibition 2026: यांत्रिकीकरणासह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने वेधले लक्ष

Solar Power Project: जालन्यात ३४१ मेगावॉट क्षमतेचे ७१ प्रकल्प मंजूर

Agrowon Exhibition 2026: कृषी उद्योग विकास महामंडळाचा महाअॅग्रो मार्ट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

SCROLL FOR NEXT