Cold Weather : राज्यात गारठा वाढू लागला

Team Agrowon

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १८ अंशांखाली आल्याने  वाढू लागला आहे.

Winter | Agrowon

कमाल तापमानात चढ-उतार सुरू असून, दुपारी उन्हाचा चटका कायम आहे.

Winter | Agrowon

रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Winter | Agrowon

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. 

Winter | Agrowon

तर ईशान्येकडील वारे सक्रिय झाल्याने रविवारी (ता. ३०) दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सर्वदूर पोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

Winter | Agrowon

उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे पोषक ठरल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे.

Winter | Agrowon

निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन दुपारी उन्हाची ताप वाढली आहे. 

Winter | Agrowon

 रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे.

Winter | Agrowon
cta image | Agrowon