Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : उत्तर महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान

Latest Monsoon Update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) परतीची वाटचाल सुरू आहे. वाऱ्यांनी संपूर्ण राजस्थानसह गुजरातच्या काही भागांतून माघार घेतली आहे.

Team Agrowon

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) परतीची वाटचाल सुरू आहे. वाऱ्यांनी संपूर्ण राजस्थानसह गुजरातच्या काही भागांतून माघार घेतली आहे. दोन दिवसांत महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मॉन्सून वारे परतण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर शनिवारी (ता. ३०) राजस्थानच्या आणखी काही भाग, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्लीसह, जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेशातून मॉन्सून परतला होता.

परतीची वाटचाल सुरू ठेवत मंगळवारी (ता. ३) उत्तराखंड, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेश, राजस्थानचा उर्वरित भाग आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. गुलमर्ग, धर्मशाला, मुक्तेश्‍वर, पिलीभीत, ओराई, अशोकनगर, इंदोर, बडोदा, पोरबंदरपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने दोन दिवसांत जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्ये, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेश आणि गुजरातच्या संपूर्ण भागासह, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Management: मान्याचीवाडीत पशूंसाठी स्नानगृह

Lift Irrigation Scheme: उद्दिष्ट ३६०० हेक्टरचे; सिंचन फक्त दोन हजारच!

Water Management: भीमा नदीपात्रात पाणी सोडा; प्रणिती शिंदे यांची मागणी

Fertilizer Dealers Notices: अमरावती विभागातील ५३ खत विक्रेत्यांना नोटिसा

Rain Crop Damage: पावसामुळे पूर्व विदर्भातील ६३०३ शेतकऱ्यांना फटका

SCROLL FOR NEXT