Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain Update : पूर्वमोसमी पावसाची शक्यता

Rain Update : अरबी समुद्रातून मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची वर्दी मिळाली आहे. पुढील काही दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : अरबी समुद्रातून मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची वर्दी मिळाली आहे. पुढील काही दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. यातच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे.

राज्यात ढगाळ आकाश होत असल्याने कमाल तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. आज (ता. ४) राज्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांत उन्हाचा चटक्यात होरपळणाऱ्या विदर्भाचे कमाल तापमान कमी झाले आहे. सोमवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ येथे उच्चांकी ४५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या खाली घसरले आहे. यातच राज्याच्या सापेक्ष आर्द्रता वाढत असून, पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत असल्याने मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान होत आहे.

आजपासून (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांसह विदर्भात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.६, धुळे ४२.५, जळगाव ४०.८, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर २८.५, मालेगाव ४२.४, नाशिक ३६.०, निफाड ३६.८, सांगली ३७.३, सातारा ३६.०, सोलापूर ४०.६, सांताक्रूझ ३५.४, डहाणू ३६.७, रत्नागिरी ३४.८, छत्रपती संभाजीनगर ३९.५, नांदेड ४१.२, धाराशिव ३९.४, परभणी ४०.५, अकोला ४२.८, अमरावती ४२.६, भंडारा ३९.५, बुलडाणा ३८.२, ब्रह्मपुरी ४०.५, चंद्रपूर ४३.४, गडचिरोली ४०.६, गोंदिया ४०.६, नागपूर ४१.८, वर्धा ४१.५, वाशीम ४२.६, यवतमाळ ४५.०.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा.

विदर्भ : अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

यवतमाळ ४५, चंद्रपूर ४३.४, अकोला ४२.८, अमरावती ४२.६, वाशीम ४२.६, धुळे ४२.५, मालेगाव ४२.४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT