Rain  Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान

Latest Weather Update : मॉन्सूनने राज्याचा निरोप घेतल्यानंतर राज्यात उष्ण व ढगाळ हवामान आहे. उन्हाचा चटका कायम असतानाच उकाडाही वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सूनने राज्याचा निरोप घेतल्यानंतर राज्यात उष्ण व ढगाळ हवामान आहे. उन्हाचा चटका कायम असतानाच उकाडाही वाढला आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. १६) सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजा, वादळी पावसाचा इशारा आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्वोत्तर भारतातील राज्ये आणि दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहूतांश भागातून मॉन्सून परतला आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्व बिहार ते दक्षिण बांग्लादेशपर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका तापदायक ठरत असून, अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे.

रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव येथे तापमान ३७ अंशांच्या पुढे होते तर, अमरावती, ब्रह्मपूरी आणि सोलापूर येथे तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. १६) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.६, जळगाव ३७.२, कोल्हापूर ३२.३, महाबळेश्वर २८.४, नाशिक ३३.५, सांगली ३३.९, सातारा ३४.४, सोलापूर ३६.४, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३४.२, छत्रपती संभाजीनगर ३३.३, नांदेड ३४.६, परभणी ३५.५, अकोला ३७.८, अमरावती ३६.६, बुलडाणा ३४.७, ब्रह्मपूरी ३६.०, चंद्रपूर ३४.६, गडचिरोली ३४.२, गोंदिया ३४.९, नागपूर ३४.९, वर्धा ३५.९, वाशीम ३५.९, यवतमाळ ३५.०.

कमी दाब क्षेत्राची होतेय निर्मिती

आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनाऱ्याजवळ समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या चक्राकार वाऱ्यांमुळे मंगळवारपर्यंत (ता.१७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वायव्येकडे सरकताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांसह वादळी पावसाचा इशारा :

सिंधुदुर्ग.

विजांसह पावसाची शक्यता :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

अकोला ३७.८, जळगाव ३७.२, अमरावती ३६.६, सोलापूर ३६.४, ब्रह्मपूरी ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT