Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान; मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ५) मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : उन्हाच्या झळा (Summer Heat) वाढल्या असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान (Rainy Weather) होत आहे. आज (ता. ५) मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानात पुन्हा वाढ झाली असून, पारा १६ ते २६ अंशांच्या दरम्यान होता.

झारखंड ते ओडिशा, आंध्र प्रदेश, रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती आहे.

पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निवळली आहे. यातच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

उद्यापासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.२ (१८.२), जळगाव ३७.६ (२१.३), धुळे ३७.० (१६.८), कोल्हापूर ३५.६ (१६.५), महाबळेश्वर २९.५ (१७.४), नाशिक ३४.१ (१७.५),

निफाड ३५.६(१८.५), सांगली ३५.९ (१७.९), सातारा ३५.७ (१८.५), सोलापूर ३८.२(२१.१), सांताक्रूझ ३१.२ (२२.४), डहाणू ३१.० (२१.६), रत्नागिरी ३१.४ (२१.२),

छत्रपती संभाजीनगर ३५.४ (२०.२), नांदेड ३८.४ (२४.६), परभणी ३८.२ (२३.१), अकोला ३९.० (२१.२), अमरावती ३८.२(२०.९), बुलडाणा ३५.६ (२२.६), ब्रह्मपुरी ३८.४ (२३.८), चंद्रपूर ३८.२ (२४.६), गडचिरोली ३४.४(२०.०),

गोंदिया ३७.० (२१.५), नागपूर ३७.४ (२१.०), वर्धा ३९.२(२५.४), वाशीम ३८.२ (२०.४), यवतमाळ ३८.५ (२१.७).

विजांसह पावसाची शक्यता

सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT