Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून माघारीसाठी होतेय पोषक वातावरण

Monsoon Return Journey : वायव्य आणि लगतच्या पश्‍चिम मध्य भारतात पुढील पाच दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होण्याचे संकेत आहेत.

Team Agrowon

Pune News : वायव्य आणि लगतच्या पश्‍चिम मध्य भारतात पुढील पाच दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होण्याचे संकेत आहेत. परिणामी, पश्‍चिम राजस्थानमधून २५ सप्टेंबरपासून नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची घोषणा होण्यासाठी वायव्य भारतात पावसाने उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे आवश्यक असते. सध्या पश्‍चिम राजस्थानमधून मॉन्सून परतीच्या प्रवासावर निघण्यासाठी पोषक स्थिती तयार होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळपत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मॉन्सूनच्या परतीची वाटचाल लांबत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी २० सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते. यंदाही अद्याप परतीचा प्रवास सुरू झाला नसून, २५ सप्टेंबरपासून मॉन्सून माघारी फिरण्याचे संकेत आहेत.

दरम्यान, यंदाच्या हंगामात मॉन्सूनचे केरळमधील आगमन ८ जूनपर्यंत लांबले. तळ कोकणात ११ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली.

२३ जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत (२५ जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच म्हणजेच २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात पोहोचला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT