Agriculture Market Bulletin: कापूस दर टिकूनकापसाला वाढलेला उठाव, आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा आणि पाॅलिस्टरच्या भावात झालेली वाढ यामुळे कापसाच्या भावात वाढ झाली आहे. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव खंडीमागे ३७०० रुपयाने भाव वाढवले आहेत. तर खुल्या बाजारात कापसाला सध्या सरासरी ८ हजार १०० ते ८ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कापसाच्या भावातील सुधारणा टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनला सध्या तेलासाठी चांगला उठाव मिळत आहे. तर शेजारच्या देशांमध्ये सोयापेंडची निर्यातही चांगली सुरु आहे. यामुळे सोयाबीनला आधार मिळत आहे. आज सोयाबीनला बाजारात ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील आवक सध्या कमीच आहे. पुढील काळातही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील सुधारणाही टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Pulses Import Issues: खाद्यतेलाप्रमाणेच कडधान्यांतही सरकारचे आत्मघातकी धोरण.हळद स्थिरदेशातील बाजारात नव्या हळदीची आवक काहिशी सुधारत आहे. हळदीची काढणी काही भागात वेग घेत असल्याने उपलब्धता सुधारत आहे. दुसरीकडे हळदीची उत्पादकता कमी आल्याचे शेतकरी सांगत आहेत. हळदीला सण आणि समारंभांमुळे मागणी चांगली आहे. तरीही नव्या मालाच्या आवकेचा दबाव आहे. सध्या हळदीला बाजारात १० हजार ते १४ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर काहिसा दबाव वाढू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Pulses Import Policy: आत्मनिर्भरतेला वाटाण्याच्या अक्षता.शेवगा आवक वाढलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई आली आहे. यामुळे विक्रमी दरापासून शेवगा खूपच कमी झाला आहे. मागील महिन्यात शेवगा ८ हजारांपेक्षा अधिक दरात विकला जात होता. पण सध्या शेवग्याला २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. शेवग्याची बाजारातील आवक आणखी काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..बेदाणा तेजीतदेशातील बाजारात सध्या बेदाण्याचा भाव तेजीत आहे. गेले महिनाभर बेदाण्याला रमजामुळे चांगला आधार मिळाला. मागणी वाढल्यामुळे दरातही वाढ झाली आहे. तसेच लग्न सराईचीही मागणी आहे. निर्यातीवर काहीसा परिणाम होत असला तरी देशातील मागणीचा आधार कायम आहे. सध्या बाजारात बेदाण्याला गुणवत्तेप्रमाणे प्रतिकिलो १५० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बेदण्याला पुढील ३ महीने चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे. तर बेदण्याची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.