IMD Alert : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Weather Update : आज (ता. २१) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
IMD Alert
IMD Alert Agrowon
Published on
Updated on

Monsoon Alert : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २१) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

IMD Alert
Maharashtra Rain : विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, उदयपूर, रतलाम, सिधी, रांची, दिघा ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत कायम आहे. कच्छ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या प्रणालीपासून पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाने विदर्भात ढगांची दाटी झाली आहे.

विदर्भासह राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी एखाद दुसरी सर सुखावून जात आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २१) विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

IMD Alert
Water Crisis : धरणांना कोरडं ! सप्टेंबर उजाडूनही देशातील धरणं २२ टक्के रिकामी

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्र कायम

वायव्य बंगालच्या उपसागरात पश्‍चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. २२) झारखंडकडे सरकण्याचे संकेत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com