Rain Update News Agrowon
हवामान

Rain Update News : ‘अवकाळी’च्या सततच्या संकटाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

बीड जिल्ह्यातील पाटोदा व गेवराई तालुक्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक होता.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासात अनेक भागात हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक गारपीटही झाली. नैसर्गिक आपत्तीच्या या संकटाने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात अवकाळी पावसाचा प्रकोप सर्वाधिक होता. या जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात सरासरी ३८.८ मिलिमीटर पाऊस झाला. तर गारपिटीने अनेक भागात नुकसान केले.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका वगळता औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील पाटोदा व गेवराई तालुक्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. जालना जिल्ह्यातील शहागड परिसरात गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात,लख्खप्रकाश पडत पाऊस झाला.

वडीगोद्री, अंतरवाली सराटी आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वीज पुरवठा खंडित होऊन पावसाबरोबर गारा ही झाल्या. घनसावंगी परिसरात जोरदार वादळा सह पाऊस झाला.

कुंभारपिंपळगावसह परिसरात गुरुवारी (ता.१६) रात्री साडेनऊ वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे व पाऊस मंठा तालुक्यात गुरुवारी दुपारी गारपीट झाली तर तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते.

कडवंची परिसरात गत दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी होत असलेल्या पावसामुळे द्राक्षाचे मनी सुकत व फाटत असून आधीच दर पडलेले असताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे.

दोन दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस येतो आहे. रात्रीच्या वेळी येत असलेल्या पावसामुळे द्राक्ष मणी फाटत आहेत. ग्राहकांना द्राक्ष कमी दरात मिळत नसले तरी उत्पादकांच्या बाबतीत आधीच द्राक्षाचे दर पडलेले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
चंद्रकांत क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी कडवंची जि. जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT