Parbhani News: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील कृषी पंपांना महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा होत नाही. स्त्रोतांना मुबलक पाणी असूनही विजेअभावी पिकांच्या सिंचनासाठी वापरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. कृषिपंपांना ८ पैकी ४ तास देखील व्यवस्थित वीज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे..यावर्षी या दोन जिल्ह्यात मे ते ऑक्टोंबर असा तब्बल सहा महिन्याच्या कालावधीत पाऊस झाला. विहिरी, विंधन विहिरी यासह सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. उघडिपीनंतर मशागतीच्या कामास वेळ लागला. हलक्या जमिनीतील ओलावा नष्ट झाला आहे. भारी जमिनीतील वरचा थर कडक झाला आहे..Agriculture Electricity : शेतकऱ्यांच्या एक लाख कृषी पंपांना कनेक्शन.त्यामुळे जमीन ओलावून रब्बीतील गहू, हरभरा,ज्वारी आदी पिकांची पेरणी करावी लागत आहे. नवीन ऊस लागवड सुरु आहे.वाढीच्या अवस्थेतील ज्वारी, गहू, हरभरा तसेच हळद, केळी, ऊस, भाजीपाला आदी बागायती पिकांना पाण्याची गरज आहे. परभणी हिंगोली जिल्ह्यात अंदाजे २ लाखपर्यंत कृषिपंप ग्राहक आहेत. भारनियमनाच्या वेळांनुसार कृषीपंपांना दिवसा व रात्री असे आलटून-पालटून जेमतेम ८ तास वीजपुरवठा केला जात आहे..परंतु अनधिकृत वीजवापर केला जात आहे. त्यामुळे अधिकृत ग्राहकांना योग्य दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. दाब वाढल्याने वीज वाहक तारा तुटत आहेत. रोहित्र बिघडत आहेत. त्यामुळे कृषी पंपाचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. रोहित्रावरील फ्युजची तुटफुट झाली आहे. बॉक्स गंजले आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे महावितरणकडून दुर्लक्ष्य केले जात आहे..बुलडाणा : कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानापासून शेतकरी वंचित.सौरकृषीपंप धारकही अडचणीत...अनामत रकमा भरून वर्षे उलटले आहे. परंतु अद्याप हजारो शेतकरी सौरकृषिपंप बसविण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अतिवृष्टी, पुरामुळे सौर कृषी पंपाचे नुकसान झाले. परंतु त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. ढगाळ वातावरणात अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे सौर कृषीपंप दिवसभर चालत नाहीत. कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..आमच्या गावात सौरकृषीपंपाधारक शेतकऱ्यांची संख्या जेमतेम ५ टक्के असेल. उर्वरित कृषीपंपधारक शेतकरी वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. योग्य दाबाने वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे नवीन ऊस लागवड, रब्बी पेरणीसाठी जमीन ओलाविण्यासाठी अडचणी येत आहेत.बाबासाहेब रन्हेर, कृषिभूषण, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी..देखभाल दुरुस्तीची कामे कृषीपंपाच्या वीजपुरवठ्याच्या वेळेत केली जातात. त्यामुळे आठ पैकी चार तास देखील व्यवस्थित वीज मिळत नाही. हरभरा, गहू, हळद पिकांना पाणी देता येत नाही. ढगाळ वातावरणात सौर पंप चालत नाहीत. विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे सिंचनाचा खोळंबा झाला आहे.शंकर गुट्टे, बेलूरा, जि. हिंगोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.