Raigad News: रायगड जिल्ह्यात भातकापणीनंतर मळणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भातशेतीतून उरले सुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे..वाढती मजुरी व मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागले आहेत. या कामादरम्यान ही मंडळी अनेक गमतीजमती, गाणी, जेवण अशी मजाही घेत आहेत..Agriculture Challenges: शेतकऱ्यांना उडदाचा कापणी, मळणी खर्च परवडेना.यावर्षी पावसाने आपला मुक्काम वाढविल्याने रायगड जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर तातडीने कापणी करून शेतकरी आता मळणीच्या कामात व्यग्र झाला आहे. नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी आले आहेत. मळणी काढण्यासाठी भल्या पहाटे शेतात दाखल होत आहेत. .Bajari Threshing : खानदेशात बाजरीची मळणी सुरूच.ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे. शेतामध्ये भाताच्या लोंब्या पिवळ्या धम्मक झाल्या, की भाताचे भारे बांधून ते एकत्रित रचून ठेवले जातात. त्याला उडवी म्हणतात आणि मग सोयीची वेळ बघून शेतकरी, त्याचे कुटुंब व आजूबाजूचे सहकारी एकत्रित येत मळणी म्हणजेच भातझोडणीचे काम सुरू करतात..याच मळणीतून मिळणारे भात म्हणजे शेतकऱ्यांची कमाई आणि कष्टाचे चीज असते. मळणी म्हणजे एक मोठा सोहळा साजरा केला जातो. संपूर्ण गावच मळणीसाठी एकत्र यायचे. अगदी लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्व जण या मळणीचा शेतावरती मनसोक्त आनंद घेतात. मजुरांच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी यंत्राने मळणी केली जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.