Nashik Rain Update : पाऊस ठरतोय सुगीच्या दिवसांत ‘काळ’

दिंडोरी तालुक्यात ओझे, नळवाडी, निगडोळ, पाडे, करंजवण, म्हेळुस्के परिसरात पावसासह गारा पडल्याने द्राक्षबगांसह कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik Rain : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीचे संकट डोक्यावर घोंघावत आहे. त्यातच बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीपासून गुरुवारी (ता. १६) सकाळी ११ वाजेपर्यंत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पिके आडवी पडली आहेत. कांदा पीकही भिजलेले आहे. द्राक्ष खुडेही थांबलेले आहेत. वादळी वारा अन् पाऊस सुगीच्या दिवसात काळ ठरत असल्याची स्थिती आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : रब्बी पिकांसह फळबागा, पालेभाज्यांचे मोठे नुकसान

रात्री २ वाजता विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. अधूनमधून जोरदार सरी पडल्याने कांदा, गहू, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी, या पावसामुळे सध्या द्राक्ष खुडे बंद झाले आहेत. पावसाचे प्रमाण कमी मात्र वारे अधिक असल्या कारणाने गव्हाचे पीक भुईसपाट झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात ओझे, नळवाडी, निगडोळ, पाडे, करंजवण, म्हेळुस्के परिसरात पावसासह गारा पडल्याने द्राक्षबगांसह कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक शहर परिसरात विजांचा कडकडाट व पाऊस सुरू झाला.

त्यामुळे द्राक्ष व भाजीपाला उत्पादकांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील हरसूल जवळील दलपतपूर येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर कळवण तालुक्यातील शहरासह पाळे, साकोरे, मानूर परिसरात जोरदार सरी पडल्या.

Crop Damage
Farmer Incentive Scheme : पिककर्ज प्रोत्साहनपर लाभापासून निम्मे शेतकरी वंचित

गाळणे (ता. मालेगांव) येथील शेतकरी शेतकरी गंगाराम सजू करणर यांचा बैलावर वीज पडल्याने मृत्यू झाला. एकीकडे वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा कांदा भिजला आहे. तर काढणीस आलेला व कापून पडलेला कांद्याचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून आली.

द्राक्ष उत्पादकांना दरात फटका

जिल्ह्यात द्राक्ष काढणी हंगामाने गती घेतली आहे. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही भागांत द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. या अडचणीच्या काळात अनेक व्यापारी व निर्यातदारांनी द्राक्ष खुडे थांबवले आहेत.

तर काही व्यापारी पडत्या दराने द्राक्ष मालाची खरेदी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे नुकसान तर दुसरीकडे दरात तडजोड अशा शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com