Weather Update Maharashtra Agrowon
हवामान

Weather Update Maharashtra : राज्यात आज-उद्या गारपिटीची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Hailstorm Update : शेतकऱ्यांना शक्य असल्यास भाजीपाला आणि फळबागांमध्ये हेलनेटचा वापर करावा. तसेच गायी, म्हशी, शेळ्या, मेंढया व इतर जनावरे मोकळ्या जागेत चारायला सोडू नयेत, असा कृषी हवामान केंद्रानं सल्ला दिला आहे.

Dhananjay Sanap

Maharashtra Weather : पुढील तीन दिवस हवामानशास्त्र विभागाने राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. २६ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर २७ आणि २८ डिसेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे रब्बी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा इशारा कृषी हवामान केंद्राकडून देण्यात आला.

शेतकऱ्यांनी पक्व फळे आणि भाजीपाला पिकांची लवकरात लवकर काढणी करावी. तसेच काढणी केलेल्या माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तर गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नव्याने लागवड केलेल्या किंवा कोवळ्या फळझाडांना नुकसान होऊ नये, यासाठी आधार द्यावा. तसेच शेतकऱ्यांना शक्य असल्यास भाजीपाला आणि फळबागांमध्ये हेलनेटचा वापर करावा. तसेच गायी, म्हशी, शेळ्या, मेंढया व इतर जनावरे मोकळ्या जागेत चारायला सोडू नयेत, असा कृषी हवामान केंद्रानं सल्ला दिला आहे.

मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तूर पिकावरील शेंग अळीच्या नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रतिहेक्टरी लावावेत. तर केळीच्या झाडांना बांबूच्या काठीने आधार द्यावा. गहू, करडई, हरभरा आणि रब्बी ज्वारीची अंतरमशगात करून घ्यावी. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कापूस आणि भाजीपाला, फळे यांची काढणी करावी.

तसेच विदर्भातील शेतकऱ्यांची मोहरी, तूर. हरभरा पिकात गरजेनुसार अंतरमशागतीची कामं करावीत. तर हरभरा पिकात घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिहेक्टरी २० पक्षीथांबे उभरावेत. काढणीला आलेल्या कापसाची वेचणी करून घ्यावी, असा सल्लाही प्रादेशिक कृषी हवामान केंद्रांकडून देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Monsoon Forecast: पाऊस यंदा ९० टक्के; मॉन्सून हंगामाचा सुधारित अंदाज जाहीर

Vidarbha Rain Alert: विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

Gram Panchayat Reservation: ग्रा. पं. सदस्यांच्या आरक्षण सोडतीला लागला मुहूर्त

Nilesh Lanke Demands: पेट्रोल व्हॅट, सरचार्ज रद्द करून जनतेला दिलासा द्या : लंके

Solapur Gram Panchayat Reservation: सोलापुरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत १२ जूनला

SCROLL FOR NEXT