फळबागांमध्ये आंबा लागवडीलाच प्राधान्य

राज्यात यंदा २० हजार २४९ हेक्टरवर लागवड
Mango Cultivation
Mango CultivationAgrowon
Published on
Updated on

नगर : राज्यात यंदा आतापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (Mahatma Gandhi National Rural Employment Grantee Scheme) (एमआरईजीएस) (MREGS) झालेल्या फळबाग लागवडीत आंबा लागवडीलाच (Mango cultivation) शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत झालेल्या ४२ हजार ३५० हेक्टरपैकी २० हजार २५९ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड झाली आहे. तर ४ हजार ७७९ हेक्टरवर संत्रा लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Sector) सूत्रांनी दिली.

Mango Cultivation
राज्यातून अडीच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून फळबाग लागवडीला (Orchard cultivation) शेतकरी प्राधान्य देत आहेत. गेल्या वर्षी ३८ हजार हेक्टरवर लागवड झाली. त्यानंतर यंदा मार्चपर्यंत ६० हजार ५० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे नियोजन केले होते. त्यापैकी यंदा मार्च अखेरपर्यंत ४२ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. यंदा फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान मिळावे म्हणून १ लाख ८ हजार २७३ शेतकऱ्यांनी अर्ज केले. खास करून कोरडवाहू भागात शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बंद असल्याने केवळ ‘एमआरईजीएस’मधून (MREGS) फळबाग लागवड झाली.

लागवड उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कृषी सहायकाला लक्ष्यांक निश्‍चित करून दिला होता. राज्यात ९ हजार १०२ कृषी सहायक आहेत. कोकणात फळबाग लागवड (Orchard cultivation) अधिक होते. त्यामुळे तेथील कृषी सहायकांना अधिकचे लक्ष्यांक होते. फळबाग लागवडीत यंदा नगर, सोलापूर, सातारा आघाडीवर आहे. उद्दिष्टानुसार झालेल्या टक्केवारीत सात जिल्हे शंभर टक्क्यांच्या पुढे गेले आहेत. सिंधी, हदगा, कडुनिंब, जट्रोफा, अंजिराची लागवड झाली नाही. नेहमी आग्रेसर असलेल्या सीताफळालाही यंदा फारसे प्राधान्य दिल्याचे दिसत नाही.

पीकनिहाय लागवड (हेक्टर)
आंबा २०२४९, काजू ३७११, डाळिंब १७६८, फणस ३११, नारळ १५११, कोकम ११९, जांभूळ ६४, बोर १५, साग २१९, बांबू ३१०, चिकू २७८, सीताफळ २४७९, सुपारी ४६, पेरू ११३९, मोसंबी ३०७०, संत्री ४७७९, कागदी लिंबू १८१०, आवळा ३८, मोगरा १०३, निशिगंध ३९, गुलाब १९, चिंच १२८, औषधी वनस्पती २, अंजीर १७, शेवगा १३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com