Monsoon Rain  Agrowon
हवामान

Monsoon 2023: तीन जिल्ह्यांवर दुष्काळाची छाया; अजूनही चांगला पाऊसच नाही !

Monsoon Rain : जुलै महिन्यात राज्यात सातत्याने कमी अधिक स्वरूपात पाऊस सूरू होता. त्यामुळे खरिपाचा पेरा वाढल्याचे दिसून आले. पण जुलै महिन्यात राज्याची सरासरी जास्त असली तरी पावसाचे वितरण समान नव्हते.

Team Agrowon

Monsoon Update : पुणेः जुलै महिन्यात राज्यात सातत्याने कमी अधिक स्वरूपात पाऊस सूरू होता. त्यामुळे खरिपाचा पेरा वाढल्याचे दिसून आले. पण जुलै महिन्यात राज्याची सरासरी जास्त असली तरी पावसाचे वितरण समान नव्हते. म्हणजेच काही जिल्ह्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आला. तर काही जिल्ह्यांमध्ये शेतातून पाणी वाहलेच नाही. परिणामी जून महिन्यातली कमी पावसाची स्थिती काही भागांमध्ये आजही कायम असल्याचं वास्तव पुढं आलं.  

जून महिन्याच्या पाऊस सरासरीपेक्षा ४६ टक्के कमी झाला. त्यामुळे पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या. जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कोकण, विदर्भात नद्यांना पूर आल्याचे चित्र पहायला मिळाले. घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. घाटमाथ्यावरील पावसाने धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली. निवडक धरणांतून पाण्याचा विसर्गही झाला. तरी मोठी धरणं भरण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे.

जून आणि जुलै महिन्यांमधील विभागनिहाय पावसाची स्थिती पाहता यंदा पावसाचे प्रमाण कमीच दिसते. कोकण आणि गोवा विभागात सरासरीपेक्षा सर्वाधिक ३३ टक्के पाऊस झाला. विदर्भात १० टक्के अधिक, तर मराठवाड्यात ९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात पावसाचे वितरण असमान असल्याने सरासरीपेक्षा १ टक्के कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.  

जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी विचारात घेता पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह सातारा जिल्ह्यात यंदा पावसाची तूट दिसून आली, तर जालना जिल्ह्यात पावसाची दडी कायम असल्याचे चित्र पहायला मिळाले. जालना जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत तब्बल ४० टक्के कमी पाऊस झाला. तर सांगली जिल्ह्यात सरासरीच्या ३२ कमी पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातही २४ टक्के पाऊस कमी झाला. 

कोकणातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सरासरी पावसाचा विचार करता नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, तेथे सरासरीपेक्षा ७३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगरात ६६ टक्के अधिक, पालघर ६२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. याशिवाय मुंबई शहर, रायगड, सिंधुदुर्ग, यवतमाळ, लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT