Cyclone Agrowon
हवामान

Cyclone Michaung : मिचाॅन्ग चक्रीवादळाची आंध्र प्रदेशातील बापतला भागात जमिनीवर धडक

Weather Report : महाराष्ट्रातील काही भागातही आज आणि उद्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Anil Jadhao 

Rain Update : मिचाॅन्ग चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीवर बापतला भागात जमिनीवर आले. यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. तर महाराष्ट्रातील काही भागातही आज आणि उद्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचाॅन्ग अतितीव्र चक्रीवादळाने आता जमिनीवर धडक दिली. आंध्र प्रदेशमधील बापतला भागातील किनारी भागात हे चक्रीवादळ जमिनीवर आले. हे चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर या भागात ९० ते १०० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. तर जोरदार पाऊसही पडत आहे. आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. मिचाॅन्ग चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पाऊस पडत आहे. यासोबतच तेलंगणातही काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे.

राज्याच्या काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे. आज मराठवड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर उद्या म्हणजेच बुधवारीही काही भागात पावसाचा अंदाज आहे.

उद्या मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील नागपूर आणि गोंदीया जिल्ह्यांमधील काही भागात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

Adam Master Retirement : माजी आमदार आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

SCROLL FOR NEXT