Swapnil Shinde
बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ निर्माण झाला आहे. त्यामुळे रुद्ररूप धारण केले आहे.
चक्रीवादळ मिचॉन्गमुळे चेन्नईमध्ये रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
चेन्नईच्या मरीना बीचवर भरती-ओहोटी वाढत असून हे वादळ ५ डिसेंबरला किनारपट्टीवर धडकणार आहे.
चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक घरे आणि अपार्टमेंटमध्येही पाणी शिरले आहे. पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे
चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा दिला आहे.
ओडिशामध्ये सकाळपासून चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आला. मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
ओडिशातील मलकानगिरी, कोरापुट, रायगडा, गंजम आणि गजपती या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.