Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर संततधार पावसाचा इशारा

Monsoon Rain Update : राज्यात मॉन्सून सक्रिय होऊन पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी, तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आज (ता. १३) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात मॉन्सून सक्रिय होऊन पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी, तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आज (ता. १३) देण्यात आला आहे. तर उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे सरकला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून चंडीगड, मुजफ्फरनगर, शाहजहानपूर, गोरखपूर, मुजफ्फरपूर, जलपैगुरी, ते नागालॅण्डपर्यंत सक्रिय आहे. उत्तर गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात हलक्या ते अति जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. कोकणात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. मुंबईतील सांताक्रूझ येथे ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर अलिबाग येथे १०२ मिलिमीटर पाऊस पडला. राज्यात ऊन-सावल्यांचा खेळात एखादं दुसरी सर पडत असली तरी राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाची उघडीप असलेल्या ठिकाणी उकाडा वाढला आहे.

राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्यास पोषक हवामान होत असून, आज (ता. १३) कोकणात सर्वदूर तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट आहे. नाशिक जिल्ह्याचा घाटमाथा आणि यवतमाळ तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो’ अलर्ट आहे. पूर्व विदर्भात विजांसह पावसाची, उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नाशिक, यवतमाळ.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT