Weather Agrowon
हवामान

Winter Weather : दापोलीत थंडीचा कडाका वाढला

Cold Weather Update : मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत थंडीचा कडाका वाढला असून, २४ तासांत किमान तापमान ९ अंश सेल्सिअसवर आले आहे.

राजेश कळंबटे

Dapoli News : मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत थंडीचा कडाका वाढला असून, २४ तासांत किमान तापमान ९ अंश सेल्सिअसवर आले आहे. पारा अजून खाली येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यामुळे थंडीत आणखी वाढ होणार आहे. या आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांची पावलेही दापोलीकडे वळालेली आहे.

गेल्या आठवड्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअसइतके पोहोचले होते. त्यानंतर पुन्हा बदल झाला आणि दापोली ‘थंडा थंडा, कुल कुल’ झाले आहे. यापूर्वी ३० नोव्हेंबरला किमान तापमान ८.८ अंशावर होते. चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला. गेल्या दोन दिवसांपासून पारा ११ अंशाखाली येऊ लागला आहे.

मागील २४ तासांमध्ये किमान तापमान ९ अंशावर आले आहे. थंडी वाढल्यामुळे दापोली तालुक्यातील आंबा बागायतदार सुखावले आहेत. हे वातावरण पुढील पंधरा दिवस असेच राहिले तरच हापूसचे उत्पादन चांगले हाती येईल, असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसच्या पेट्या बाजारात जाण्यास सुरुवात झाली होती.

मात्र यंदा डिसेंबर महिना संपत आला तरीही ६० टक्क्यांहून अधिक बागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आलेला आहे. हा मोहोर पुढील काही दिवसांत जून होऊन त्याला फळधारणा होण्यास सुरुवात होईल. त्यासाठी किमान २० ते २५ दिवसांचा कालावधी लागेल. या वेळेत मोहोरावर पडणाऱ्या तुडतुड्यांपासून आंबा बागा जपण्याचे आव्हान बागायतदारांपुढे आहे.

त्यादृष्टीने हवामानातील बदल प्रत्येक बागायतदाराला टिपावे लागणार आहेत. औषध फवारण्यांचे वेळापत्रक, बागांची सफाई, सुकलेला मोहोर पाडून टाकणे किंवा कीड-मुंग्यांपासून मोहोर सुरक्षित ठेवणे या गोष्टींवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे.

पर्यटकांच्या रांगा

अल्हाददायक थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची दापोलीत गर्दी होत आहे. तसेच संपूर्ण किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांची सफेद रंगाची चादर अजूनही दिसून येत आहे. त्यांच्या जोडीला डॉल्फिन मासेही किनारीभागात आले आहेत. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. किनारीभागात समुद्रसफरीही घडवून आणल्या जात आहेत. थंडीमुळे डॉल्फिन किनाऱ्यापासून काही अंतरावर येत आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Student Travel: शिक्षणासाठी पाच लाखांवर मुलांचे ‘अप-डाउन’

Bogus Voter List: मतदार यादीत घोळ, मात्र आयोग कारवाई करणार नाही : पवार

Turmeric Rate: हळदीच्या दरावरील दबाव कायम

Banana Rate: हंगामी फळांची आवक वाढली, केळी दरांना फटका

Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार

SCROLL FOR NEXT