Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : राज्यातील बहुंताशी भागात थंडी कायम; काही भागात किमान तापमानात वाढ

Maharashtra Winter Weather : उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. मात्र आज राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात काहिशी वाढ झाली होती.

Anil Jadhao 

Pune News : उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. मात्र आज राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात काहिशी वाढ झाली होती.

तर राज्यात काही ठिकाणी थंडीची लाटही कायम आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली असल्याने हुडहुडी कायम आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ७ अंश तापमानाची नोंद झाली होती.  

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली आज उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याचे संकेत आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक होत असल्याने आज पंजाबच्या ‘आदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. केरळ येथील कन्नूर येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. 

राज्यात तापमानात आज चढ उतार दिसून आले. किमान तापमान निचांकी पातळीवरून काहीसे वाढले आहे. मात्र राज्यातील अनेक भागात थंडी कायम आहे. तर काही ठिकाणी थंडीची लाट होती.

आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ७ अंश तापमानाची नोंद झाली होती. तर निफाड येथील गहू संसोधन केंद्रात ८.४ अंश सेल्सिअस तापमान होते. नाशिक येथे ८.८ अंश सेल्सिअस, जळगाव ९.५ अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगर येथे ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT