Weather  Agrowon
हवामान

Cold Wave In Maharashtra : राज्यातील ७ जिल्ह्यात थंडीची लाट; पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता

Weather Update : राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील गारठा दिवसाही वाढला आहे. आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिलाय. राज्यात जेऊर येथे निच्चांकी ५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

पुढील चार दिवस राज्यातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात पुढील २४ तासात जैसे थे राहील. तसेच २४ तासांनंतर मात्र महाराष्ट्राच्या ईशान्य भागात किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सियसने वाढेल, असा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

तसेच बुधवारपासून म्हणजेच १८ डिसेंबरपासून राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात तुरळक भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र प्रामुख्याने स्वच्छ सूर्यप्रकाश राहील.

तर गुरुवारपासून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT