Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज

Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून (ता. ९) ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात गारठा कमी होऊन, उन्हाचा चटका आणि उकाड्यातील वाढ होत आहे. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पार गेला आहे. तापमानातील वाढ कायम राहण्याबरोबरच, विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून (ता. ९) ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. बुधवारी (ता. ७) हरियानातील कर्नाल यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंदीगड, उत्तराखंड, राजस्थानमध्ये किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे. यातच पूर्व विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.


राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, वाशीम, यवतमाळ यथे पारा ३५ अंशांच्या वर आहे. किमान तापमानाचा पारा ११ ते २२ अंशांच्या दरम्यान असून, थंडी कमी झाली आहे. आज (ता. ८) तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३५.१ (१६.१), धुळे ३२ (११.५), जळगाव ३३.२ (१४.५), कोल्हापूर ३५.१ (२१), महाबळेश्‍वर २८.९ (१८.१), मालेगाव ३५.६ (१६.२), नाशिक ३२.९ (१४.८), निफाड ३२.२ (११.६), सांगली ३५.५ (२०.०), सातारा ३४.५ (१७.६), सोलापूर ३७.२(२०.९),

सांताक्रूझ ३३.५ (२१.१), डहाणू २९.४ (२०.४), रत्नागिरी ३३.८ (२१.१), छत्रपती संभाजीनगर ३३ (१७), नांदेड (१९.४), परभणी ३४.६ (१८.४), अकोला ३५.१ (१७.४), अमरावती ३३.४ (१७.५), बुलडाणा ३३ (१६.८), ब्रह्मपुरी ३४.५ (१८.४), चंद्रपूर ३३.८ (१७.६), गडचिरोली ३२ (१७), गोंदिया ३२.३ (१५.६), नागपूर ३४.२ (१८.६), वर्धा ३४.५ (१८), वाशीम ३५.२ (१६.४), यवतमाळ ३५ (१८.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: कोल्हापुरात ऊसदराची कोंडी कायम; साखर कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

Farmer Compensation Delay: केवायसी पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांचा पीक नुकसान मदतनिधी रखडला

Soil Testing: माती परीक्षणातून खतांचा संतुलित वापर करा; पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Ujani AI Data Center: उजनीतील ‘एआय डेटा सेंटर’ला विरोध

Financial Assistance for Farmers: शेतकरी, शेतमजुरांना स्वतंत्र आर्थिक साह्य द्या; खासदार भगरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT