Weather Update Agrowon
हवामान

Weather Forecast : ढगाळ हवामान, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Cloudy Weather : आज (ता. १८) राज्यात ढगाळ हवामानसह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune Weather Update : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्याने तडाखा दिल्याने उन्हाची ताप, उकाडा वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. आज (ता. १८) राज्यात ढगाळ हवामानसह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशाच्या बहूतांश भागातून मॉन्सून परतला आहे. राजस्थान, हरियाणामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगतची चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. अंदमान समुद्रातील चक्राकार वाऱ्यांपासून ते तामीळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका तापदायक ठरत असून, अनेक ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३५ अंशांच्या पुढे आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपूरी, अकोला, सोलापूर, वाशीम येथे तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १८) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानसह, कमाल तापमानात वाढ होऊन, ढगाळ आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.०, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३३.६, महाबळेश्वर २५.७, नाशिक ३३.३, सांगली ३४.०, सातारा ३२.६, सोलापूर ३६.०, सांताक्रूझ ३५.६, डहाणू ३५.६, रत्नागिरी ३४.०, छत्रपती संभाजीनगर ३४.४, नांदेड ३४.२, परभणी ३४.५, अकोला ३६.५, अमरावती ३५.४, बुलडाणा ३३.५, ब्रह्मपूरी ३६.८, चंद्रपूर ३३.८, गडचिरोली ३४.२, गोंदिया ३४.२, नागपूर ३४.४, वर्धा ३५.०, वाशीम ३६.०, यवतमाळ ३५.०.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

जळगाव ३७.०, ब्रह्मपूरी ३६.८, अकोला ३६.५, सोलापूर ३६, वाशीम ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT