Cloudy Weather Agrowon
हवामान

Cloudy Weather : ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. दीड महिन्यापूर्वीच दुबार भाताची लावणी करण्यात आली आहे.

Team Agrowon

रसायनी, जि. रायगड : काही दिवसांपासून हवामान बदलामुळे (Change Weather) तापमानात वाढ झाली आहे. रसायनी पाताळगंगा परिसरात दुबार भातपिकाला सध्याच्या खराब हवामानाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे.

परिसरात पाताळगंगा नदीच्या काठच्या गावातील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याचा; तसेच माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाचा जांभिवली पंचक्रोशीत आणि मोहोपाडा येथील शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा आधार आहे.

शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. दीड महिन्यापूर्वीच दुबार भाताची लावणी करण्यात आली आहे.

यंदाच्या हंगामात अवनी, रत्ना याशिवाय इतर संकरित जातीच्या वाणांचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. सुरुवातीला बियाणे पेरणीनंतर रोपांच्या वाढीसाठी थंडीचे अनुकूल वातावरण होते. त्यामुळे रोपांची वाढ चांगली झाली.

लावणीसाठी पोषक वातावरण असल्याने आतपर्यंत पिकांची वाढ चांगली झाली. सध्या १० ते १२ दिवसांपासून हवामानाच्या बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे. मध्येच ढगाळ वातावरण येते. अशा खराब हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT