Kharif Season: बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाहीत, अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन अन् विकास समितीच्या निधीतून (डीपीडीसी) मोफत बी-बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कृषी, शेतरस्ते, आदिवासी विकास आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारच्या विविध निर्णयांची माहिती दिली..Soybean Seed Distribution: पुरंदरमधील पात्र शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध.राज्यात अनेक ठिकाणी (विशेषतः अमरावती, अकोला, नागपूर व इतर भागांत) वितरकाने बोगस बियाणे दिल्यामुळे सोयाबीन किंवा कापसाचे पीक उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पीक पेरणीनंतर ते न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंड पडू नये,.म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातील ‘डीपीडीसी’ निधीतून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी निधी व बियाणे उपलब्ध करून देतील, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले..Cotton Seed Distribution: ‘कापूस उत्पादकता’अंतर्गत घुसर येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप.शेतरस्त्यांसाठी ‘डिजिटल डॅशबोर्ड’शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकारने एक विशेष ‘डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डॅशबोर्ड’ तयार केला आहे. या माध्यमातून शेत रस्त्यांची मोजणी करणे, रस्ते खुले करणे आणि त्यांना क्रमांक देणे या प्रक्रिया गतिमान केल्या जातील. या ‘प्लॅटफॉर्म’द्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या रस्त्याबाबतच्या तक्रारींवर थेट लक्ष ठेवले जाईल. ते संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच कार्यान्वित केले जाईल..पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठपालघर जिल्ह्यातील दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी उत्पन्न बाजारपेठ निर्माण करण्याचा मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बाजारपेठेमुळे राज्यातील शेतीमालाला जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ आणि वाव मिळण्यास मदत होणार आहे..आदिवासींना वनपट्टे वाटपआदिवासी भागातील ज्या बांधवांना अद्याप वनहक्क पट्टे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठीवनहक्क समितीची पुन्हा बैठक घेऊन पुनर्विलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यानंतर पात्र आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचे तातडीने वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.