Paddy Transplanting: भात पट्ट्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मागील आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने भात लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात भात उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर रोपवाटिका तयार केल्या असून आतापर्यंत ५ हजार ८६१ हेक्टरवर रोपवाटिका झाल्या आहेत. .येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास भात लागवडी वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. सध्या पुरेसे पाणी असलेल्या अनेक ठिकाणी भात लागवडी सुरू आहेत..Paddy Replanting: सिंधुदुर्गमध्ये भातरोपे पुनर्लागवडीला वेग.यंदा शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून खरीप हंगामाची तयारी सुरू केली होती. मात्र, जूनमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने भात लागवडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १७६.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ७१.६ मिलिमीटर (४१ टक्के) पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकण्यास विलंब केला..Paddy Seedlings: भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड.जुलैच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरणासह काही भागांत चांगला पाऊस झाला. त्यानंतर ९ जुलैपासून पावसाने उघडीप दिल्याने रोपवाटिकांची वाढ चांगली झाली आहे. साधारण २० ते २५ दिवसांत भाताची रोपे लागवडीस तयार होत आहे..जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ६१ हजार १०१ हेक्टर आहे. यंदाही सुमारे ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भात लागवड होण्याचा अंदाज असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे सुमारे सहा हजार हेक्टरवर रोपवाटिका झाल्या होत्या. टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसामुळे भात लागवडी वेळेत पूर्ण झाल्या होत्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.