Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : नागरिकही करू शकणार हवामान हालचालींची नोंद

आपल्या परिसरात पाऊस पडला, गारपीट झाली, तरीही ती माहिती नागरिक थेट हवामान विभागाला देऊ शकणार आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Weather Update Pune आपल्या परिसरात पाऊस पडला, गारपीट (Hailstorm) झाली, तरीही ती माहिती नागरिक थेट हवामान विभागाला (Weather Department) देऊ शकणार आहेत. याबाबत हवामान खात्याने आपल्या संकेतस्थळावर ही सुविधा सुरू केली आहे. त्यात नागरिकांना हवामानाच्या हालचालींचीही (Weather Movement) नोंद करता येणार आहे.

हवामान खात्याने आपल्या https://mausam.imd. gov.in/ या वेबसाइटवर ‘पब्लिक ऑब्झर्व्हेशन’ नावाची विंडो सुरू केली आहे. त्यावर जाऊन नागरिक त्यांच्या क्षेत्रातील स्थानिक हवामान घडामोडींची माहिती देऊ शकतात. यामुळे हवामान खात्याला त्याचा ‘डेटाबेस’ अधिक तपशीलवार बनविण्यात मदत होईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

हवामान विभाग आपल्या देशभरातील विविध केंद्रांद्वारे दररोज सर्व हवामान घडामोडींची माहिती आणि अंदाज देतात. त्यासाठी सॅटेलाइट इमेजेस आणि ‘रडार’ इत्यादी प्रणालींचा वापर केला जातो.

तर तापमान आणि पावसाच्या प्रमाणाची हवामान केंद्रांवर नोंद केली जाते. परंतु काही हंगामी घडामोडी असतात, ज्यांचा प्रभाव मर्यादित क्षेत्रापुरताच असतो. तर बऱ्याचदा तेथे कोणतेही हवामान केंद्र नसते. त्यामुळे त्या घटना अनेक वेळा दुर्लक्षित राहतात. त्यांची कोठेही नोंद नसते.

नागरिक अशी देऊ शकतात माहिती...

हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावर ‘पब्लिक ऑब्झर्व्हेशन’ नावाची विंडो सुरू केली आहे. त्यामध्ये त्या राज्य, जिल्हा आणि संबंधित हंगामात घडलेल्या वेळेची माहिती देता येईल.

त्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या हंगामी घडामोडींचे कॉलम आहेत, ज्यावर फक्त टीक करून माहिती द्यावी लागेल. यात झाडपडीसारख्या नुकसानीची माहितीदेखील देता येईल.

उपक्रमाचा उद्देश असा...

- हवामान विभागाच्या केंद्रांची संख्या मर्यादित. त्यामुळे सर्व माहिती मिळविण्याचा प्रयत्न

- नागरिकांकडून अभिप्राय आल्यास मोठा ‘डेटाबेस’ तयार करता येणार

- हवामान खात्याकडील आधीच्या आकडेवारीत नवीन माहितीची सांगड घालून त्यातील त्रुटी दूर करता येणार

- हवामानविषयक अधिक घडामोडींच्या ठिकाणी हवामान केंद्र स्थापन करता येणार

गेल्या काही वर्षांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. त्याच्या नोंदी हवामान विभागाकडे अनेक वेळा येत नाहीत. ही सर्व माहिती हवामान विभागाकडे येऊन त्यावर अभ्यास करता येईल. त्यामुळे हे बदल केले आहेत.
- के. एम. होसाळीकर, प्रमुख, पुणे हवामान विभाग, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT