Weather News Agrowon
हवामान

Weather News : उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

High Temperature : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्यानंतर आता पुन्हा सूर्य तळपण्याचे संकेत आहेत. आज (ता. २१) राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्यानंतर आता पुन्हा सूर्य तळपण्याचे संकेत आहेत. आज (ता. २१) राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम विदर्भ आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर तेलंगणा परिसरावर सक्रिय आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मध्य प्रदेशापासून दक्षिण आसामपर्यंत हवेचा कमी दाब पट्टा तयार झाला आहे. राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उघडीप देण्याचे संकेत आहेत.

बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून, राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. वादळी पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून, राज्यात उन्हाची ताप वाढण्याचा अंदाज आहे.

बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.८, नगर ३५.०, धुळे ३६.०, जळगाव ३६.७, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३०.८, नाशिक ३५.५, निफाड ३४.१, सांगली ३७.२, सातारा ३७.२, सोलापूर ३८.४, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३२.५, रत्नागिरी ३१.९, छत्रपती संभाजीनगर ३५.४, नांदेड ३६.४, परभणी ३७.७, अकोला ३७.३, अमरावती ३५.२, बुलडाणा ३४.७, ब्रह्मपुरी ३६.२, चंद्रपूर ३४.४, गडचिरोली ३२.०, गोंदिया ३१.०, नागपूर ३२.६, वर्धा ३४.९, वाशीम ३८.६, यवतमाळ ३७.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT