Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Update: राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता; मॉन्सून 'जैसे थे'

Maharashtra Rain Forecast: महाराष्ट्रात सात दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल थांबली. पुढील तीन दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Dhananjay Sanap

Pune News: यंदा जोरदार मुसंडी मारून सरासरी वेळेच्या पूर्वीच महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सून म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मागील ७ दिवसांपासून थिजली आहे. मॉन्सूनचे प्रवाह मंदावले आहेत. त्यामुळे मॉन्सूनचा मुक्काम एकाच भागात जैसे थे आहे. राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळत होती. परंतु आज विविध भागात पावसाची शक्यता असून पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.  

राज्यात सकाळपासून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरीने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला. राज्यात मॉन्सून मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहचलेला आहे. परंतु त्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल थिजली आहे. मॉन्सूनची सीमा आजही मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागात कायम आहे. राज्यात आज काही भागात वीजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरतळक ठिकाणी वीजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि वीजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर नांदेड, लातूर, धाराशीव, हिंगोली, बीड परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर मॉन्सूनच्या पुढील वाटचालीबद्दल हवामान विभागाने काहीही अंदाज वर्तवले नाहीत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune MTI Journey: ‘एमटीआय’ची आठ दशकी दमदार वाटचाल

Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

SCROLL FOR NEXT