Rain Forecast  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast : दक्षिण महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता कायम

Maharashtra Weather Update : राज्याच्या दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान झाले आहे. तसेच राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान असून, किमान तापमानातही चढ-उतार होत आहेत.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान झाले आहे. तसेच राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान असून, किमान तापमानातही चढ-उतार होत आहेत. उन्हाचा चटका कमी झाला असला, तरी दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. आज (ता. ८) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकणात कमाल तापमानाचा पारा ३४ ते अंशांच्या दरम्यान असून, उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ-घट सुरूच आहेत. मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान होते.

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी काहीशी कमी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. ७) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ८) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१६.४), जळगाव ३३.५ (१४.७), कोल्हापूर २९.२ (२२.५), महाबळेश्‍वर २६.५ (१७.४), नाशिक ३०.२ (१५.२), निफाड ३२.२ (१३.५), सांगली ३०.४ (२२.३), सातारा ३१.९ (२०.३), सोलापूर ३३.२ (२१.५), सांताक्रूझ ३४.४ (२१.४), डहाणू ३६.१ (२१.४), रत्नागिरी ३४.३ (२४.३),

छत्रपती संभाजीनगर ३०.६ (१४.८), नांदेड ३१.४ (२०.४), परभणी ३१.५ (१९.५), अकोला ३३.८ (१५.१), अमरावती ३२.४ (१७.१), बुलडाणा ३२ (१६.४), ब्रह्मपुरी ३४.४ (१८.१), चंद्रपूर ३२.४(१७.६), गडचिरोली ३२.२ (१७), गोंदिया ३२.६ (१५.६), नागपूर ३२ (१६.०), वर्धा ३२ (१६.०), वाशीम ३३.४ (१५.४) यवतमाळ ३२.२ (१४.५).

कमी दाब क्षेत्राची शक्यता

आग्नेय अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रात आज (ता. ८) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. वरील प्रणालीपासून दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT