Rain Update In Maharashtra Agrowon
हवामान

Rain Update In Maharashtra : राज्यात पावसाची शक्यता

Weather Update : वाऱ्याची दिशा दक्षिण कोकणात आग्नेयेकडून, तर उत्तर कोकणात नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्रातही वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Monsoon Update : या आठवड्यात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल, तर दक्षिणेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल इतका राहील. त्या वेळी अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ मुंबईच्या पश्‍चिमेस १ हजार किमी अंतरावर असेल.

साधारण सोमवार ते बुधवार (ता. १२ ते १४) दरम्यान हे वादळ गुजरातच्या पश्‍चिम दिशेकडून उत्तर दिशेकडे प्रवास करेल. गुरुवारी (ता. १५) कराचीच्या किनारपट्टीजवळ असेल. वादळाने दिशा बदलल्यास ते ओमेनच्या जवळून उत्तरेच्या दिशेने जाईल, असे जागतिक हवामान संघटनेचे म्हटले आहे.

वादळाचे केंद्रस्थानी ९९० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. अखेरच्या टप्प्यात चक्राकार वाऱ्याचा वेग वाढेल. हे चक्रीवादळ अरबी समुद्रातील पाणी व त्यावरील बाष्प मोठ्या प्रमाणात खेचून घेऊन जाईल. त्याचा मोठा परिणाम मॉन्सूनच्या आगमनावर होण्याची शक्यता असून, त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनची आगमन लांबणे शक्य आहे.

वादळ पश्‍चिम किनारपट्टीजवळून साधारण १ हजार किमी अंतरावरून उत्तर दिशेस जाताना कर्नाटक, गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होईल. कमाल व किमान तापमानात घट होईल. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल.

हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा दक्षिण कोकणात आग्नेयेकडून, तर उत्तर कोकणात नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्रातही वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल.

प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस, अरबी समुद्र व हिती महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमानही ३१ अंश सेल्सिअस राहील; तर बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील.

कोकण

कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८६ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७१ ते ८० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ५० ते ५४ टक्के, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८ किमी, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ताशी ११ ते १४ किमी राहील.

वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. आज (ता.११) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५३ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ३३ मिमी, रायगड जिल्ह्यांत ११ मिमी, तर उद्या (ता.१२) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात २८ मिमी, रायगड जिल्ह्यांत १८ मिमी, ठाणे जिल्ह्यात ८ मिमी पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ७१ टक्के, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ६५ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २५ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १८ ते २१ किमी राहील.

वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. आज (ता. ११) जळगाव, धुळे व नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्यांत ५ ते ६ मिमी पावसाची शक्यता राहील. उद्या (ता. १२) सर्वच जिल्ह्यांत ५ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा

कमाल तापमान धाराशिव, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव व लातूर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर बीड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस कमाल तापमान परभणी व जालना जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ६० ते ६२ टक्के, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५१ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २६ ते ३३ टक्के राहील.

सर्वच जिल्ह्यात वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन तो १४ ते २० किमी इतका अधिक राहील. वाऱ्याची दिशा परभणी, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर नांदेड, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

आज (ता. १०) धाराशिव जिल्ह्यात ८ मिमी, लातूर जिल्ह्यात ५ मिमी, बीड जिल्ह्यात २० मिमी, तर परभणी जिल्ह्यात ५ मिमी, नांदेड जिल्ह्यात ६ मिमी आणि हिंगोली व जालना जिल्ह्यांत ५ ते ६ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१२) नांदेड जिल्ह्यात ३२ मिमी, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ३ ते ११ मिमी शक्यता आहे.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३९ ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २७ टक्के राहील.

वाऱ्याचा ताशी वेग २० ते २१ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. आज (ता. ११) वाशीम जिल्ह्यात ६ मिमी, अमरावती जिल्ह्यात ४ ते ५ मिमी व बुलडाणा जिल्ह्यात ४ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. १२) वाशीम जिल्ह्यात ४५ मिमी, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३ ते ४ मिमी पावसाची शक्यता आहे.

मध्य विदर्भ

कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २४ टक्के राहील.

वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १८ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. आज (ता. ११) यवतमाळ जिल्ह्यात ६ मिमी, तर नागपूर जिल्ह्यात ३ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१२) यवतमाळ जिल्ह्यात ४६ मिमी पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४६ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २६ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १९ टक्के राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. चंद्रपूर जिल्ह्यात आज (ता. ११) आणि उद्या (ता. १२) ५ ते १० मिमी पावसाची शक्यता राहील. गडचिरोली जिल्ह्यात उद्या (ता.१२) ९ मिमी पावसाची शक्यता आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर पुणे व नगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ८० ते ८५ टक्के, तर सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३० ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व नगर जिल्ह्यांत १९ ते २० किमी, तर कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ताशी ९ ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

आज (ता.११) नगर जिल्ह्यात १३ मिमी, पुणे जिल्ह्यात ४ मिमी, सांगली जिल्ह्यात १४ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ८ मिमी, तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत १८ मिमी पावसाची शक्यता राहील. उद्या (ता. १२) सर्वच जिल्ह्यांत ३ ते ६ मिमी पावसाची शक्यता आहे.

कृषी सल्ला

- जमिनीत वाफसा आल्यानंतर पेरण्या कराव्यात. धूळवाफ पेरणी करू नये.

- फळबागांमध्ये जमिनीतील ओलावा पाहून सिंचन करावे.

- जनावरे व कुक्कुट पक्ष्यांना भरपूर स्वच्छ पाणी द्यावे. तसेच पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे.

- रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT