Rain Update  Agrowon
हवामान

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पावसाची शक्यता

IMD Alert : हवामान विभागाने गुरुवारी (ता. २३) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा असून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

Weather Report : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. आजपासून (ता. २३) कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तमिळनाडूच्या आणि केरळमध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत (ता. २६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आजपासून महाराष्ट्राच्या दक्षिणकडे असलेल्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे देशातील उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. किमान तापमानातही चढ-उतार सुरूच असून, बुधवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.६ (१४.९), धुळे ३२ (१२.२), जळगाव ३२.३ (१४.५), कोल्हापूर ३१.३ (१९), महाबळेश्‍वर २४.६ (१५.४), नाशिक ३१.३ (१४.७), निफाड ३१ (१३.१), सांगली ३१.४ (१७.९), सातारा ३१.५ (१६.५), सोलापूर ३५ (१९.८), सांताक्रूझ ३५.६(२२.८), डहाणू ३४.७ (२१.३), रत्नागिरी ३६.१ (२२.५), छत्रपती संभाजीनगर ३१.८ (१६.४), नांदेड - (१८.६), परभणी ३१.२ (१७.८), अकोला ३२.९ (१८), अमरावती ३२.८ (१८.५), बुलडाणा ३१ (१६.८), ब्रह्मपूरी ३३.७ (१८.६), चंद्रपूर ३१.८(१६.६), गडचिरोली ३० (१६), गोंदिया ३०.८ (१५.६), नागपूर ३१.४ (१६.८), वर्धा ३१ (१८), वाशीम ३३ (१७.६), यवतमाळ ३३.५ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT