Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast : सिंधुदुर्ग, कोल्हापूरात पावसाची शक्यता

Latest Rain Update : राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी दक्षिणेकडे मात्र अद्याप जोरदार थंडीची प्रतिक्षा आहे.

अमोल कुटे

Weather Update Pune : राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी दक्षिणेकडे मात्र अद्याप जोरदार थंडीची प्रतिक्षा आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात कमाल तापमानाचा पारा हळुहळू कमी होत असला तरी अद्यापही उन्हाचा चटका जाणवत आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सांताक्रूझ येथे उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ आणि रत्नागिरी वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर महाराष्ट्रातील गारठा कायम असला तर किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. शुक्रवारी (ता. ३) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १४.२ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी, उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे.

शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.४ (१६.०), जळगाव ३३.२ (१४.२), कोल्हापूर ३२.१ (२०.९), महाबळेश्वर २६.१ (१६.४), नाशिक ३१.४ (१५.६), निफाड ३२.० (१४.५), सांगली ३२.३ (२०.२), सातारा ३२.० (१७.६), सोलापूर ३४.६ (१९.४), सांताक्रूझ ३६.० (२२.६),

डहाणू ३४.१ (२२.२), रत्नागिरी ३५.६ (२२.८), छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१४.८), नांदेड ३२.६ (१८.०), परभणी ३२.५ (१८.०), अकोला ३३.५ (१८.६), अमरावती ३१.६ (१९.७), बुलढाणा ३१.३ (१८.०),

ब्रह्मपूरी ३४.६ (२१.१), चंद्रपूर ३१.४(१८.६), गडचिरोली ३२.८ (१६.८), गोंदिया ३१.८ (१८.०), नागपूर ३२.२ (१८.६), वर्धा ३१.९(१९.०), वाशीम ३२.२(१६.४) यवतमाळ ३३.५ (१७.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Procurement: राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी

Vidarbha Irrigation Update: शासन लेखी विदर्भातील सिंचन अनुशेष संपुष्टात

Kidney Trafficking: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावा

Irrigation Subsidy Issue: मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढणार

SCROLL FOR NEXT