Weather Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता

Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. पहाटे गारवा, दुपारी चटका अशी स्थिती असून, पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण छत्तीसगड आणि ओडिशा परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नैॡत्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होत आहे. कमाल तापमानातील वाढ कायम असून, किमान तापमानात चढ-उतार होत आहे. पहाटे धुक्याची चादर, दव पडल्याचे चित्र कायम आहे.

मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूर, जळगाव, पुणे, सांताक्रूझ, डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, वर्धा येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ३०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.२ (१८.९), अहिल्यानगर ३२.८ (१६.५), जळगाव ३४.३ (१७.८), कोल्हापूर ३१.६ (२२.८), महाबळेश्वर २८.८ (१५.४), मालेगाव ३२.४ (२०), नाशिक ३४.१ (१९.१), निफाड ३३.३ (१६.४), सांगली ३२.७ (२१.४), सातारा ३२.७ (१८.२), सोलापूर ३४.७ (२२.९), सांताक्रूझ ३४.२ (२५.६),

डहाणू ३४.२ (२४.२), रत्नागिरी ३२.८ (२४.८), छत्रपती संभाजीनगर ३४.१ (१८.९), बीड ३२.६ (१७.५), धाराशिव ३३ (१९), परभणी ३३.९ (२०.५), अकोला ३४.१ (२०.४), अमरावती ३५ (१९.५), भंडारा ३० (२२), बुलडाणा ३१.५ (२२), ब्रह्मपुरी - (२४.४), चंद्रपूर ३३(२१), गडचिरोली ३२ (२१.२), गोंदिया ३३.२ (२२.२), नागपूर ३३.७ (२१.४), वर्धा ३४ (२१.४), वाशीम ३३.६ (-), यवतमाळ ३२.५ (१९.५).

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव.

३४ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : अमरावती ३५, सोलापूर ३४.७, जळगाव ३४.३, पुणे ३४.२, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३४.२, नाशिक ३४.१, छत्रपती संभाजीनगर ३४.१, अकोला ३४.१, वर्धा ३४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवड क्षेत्र वाढणार

Vikhe Thorat Political Conflict : विखे-थोरांताच्या तिसऱ्या पिढीतील राजकीय संघर्षही तीव्र

Paddy Harvesting : भात काढणीची कामे वेगात; मजुरांची मोठी टंचाई

Maharashtra Vidhansabha Election : संभाव्य उमेदवारांना पक्षांनी आधीच दिले एबी फॉर्म

Importance of Indigenous Cow : बदलत्या हवामान परिस्थितीत देशी गायींचे महत्त्व अनन्यसाधारण

SCROLL FOR NEXT