Heavy Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : उद्यापासून विदर्भात पाऊस सुरु होणार; शनिवारी राज्यभरात पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Rain Forecast : हवामान विभागाने उद्यापासून राज्याच्या काही भागात पाऊस सुरु होईल, असा अंदाज दिला. तसेच शनिवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली.

अनिल जाधव

Maharashtra IMD Rain Alert : राज्यात पावसाने यंदा उघडीप दिली. आज सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. पण सर्वदूर जोरदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना अद्यापही आहे. हवामान विभागाने उद्यापासून राज्याच्या काही भागात पाऊस सुरु होईल, असा अंदाज दिला. तसेच शनिवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली.

राज्यात उद्यापासून काही भागात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर उद्या मराठवाडा आणि खानदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भासह मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली. तर खानदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्याच्या इतर भागात ठिकठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने दर्शविली.

शनिवारी राज्यभरात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शनिवारी राज्यातील सर्वच भागात ठिकठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज दिला. शुक्रवार आणि शनिवारी विदर्भ आणि मराठड्यात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Reservoir Storage : देशातील जलशयात पाणीसाठ्यात झपाट्याने घट; राज्यात प्रमुख जलशयात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Power Tiller Care: पॉवर टिलरची देखभाल कशी करावी?

Kannad Naksha Project: कन्नड नक्शा प्रकल्पाचे काम पूर्ण

Maize Prices Crash: मक्याचा दर हमीभावाच्या खाली, तेलंगणातील शेतकरी अडचणीत, सरकारकडे मदतीची मागणी

Fertilizer Supply: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २ लाख ९२ हजार टन खत पुरवठा मंजूर

SCROLL FOR NEXT