Crop Advisory: महाराष्ट्रावर आज (ता.२९) १००४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. मात्र उद्यापासून शनिवारपर्यंत (ता.३० जून ते ५ जुलै) हवेचे दाब १००४ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. त्यामुळे काही काळ पावसात उघडीप, तर काही काळ हलक्या पावसाच्या शक्यता निर्माण होईल.
हवामान बदलाच्या प्रभावाने हवेच्या दाबात बदल होतात. अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असल्याने हवेचे दाब वाढत आहेत. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाल्याने ढगांची निर्मिती कमी होऊन पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र त्याच वेळी बंगालचे उपसागराच्या व हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत असल्याने बंगालच्या उपसागराची शाखा कार्यरत राहत आहे. त्यातूनच ढगनिर्मिती होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता निर्माण होईल.
प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने तेथील हवेच्या दाबात वाढ होत आहे. हिंदी महासागरावरील वारे भारताचे दिशेने येत आहेत. सध्या मॉन्सूनने भारताचा बहुतांशी भाग व्यापला आहे. राजस्थान, पंजाब व हरियानाचा काही भाग ५ जुलैपर्यंत व्यापला जाईल. त्यानंततर मॉन्सून संपूर्ण भारत व्यापेल. विदर्भ व मराठवाड्यात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
कोकण
आज (ता.२९) रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६५ मिमी, तर पालघर, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ३५ मिमी पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसातील वितरणात फरक आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहिल. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी १० ते ११ किमी, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी १३ ते १४ किमी आणि पालघर जिल्ह्यात ताशी १६ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राही. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ८२ ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८१ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता. २९) धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २ ते ३ मिमी, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ६ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी १७ ते १८ किमी, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत ताशी २० ते २१ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ७० ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६६ टक्के राहील.
मराठवाडा
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आज (ता.२९) १ ते २ मिमी पावसाची शक्यता आहे. पावसात बराच काळ उघडीप राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताशी २० किमी, तर नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ताशी २१ किमी राहील. धाराशिव व परभणी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २२ किमी, तर लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी २३ किमी राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल.
कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशीव जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर लातूर व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ६७ ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४९ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज (ता. २९) बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २ ते ३ किमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ताशी १६ किमी, तर बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत ताशी २० किमी राहील. कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आद्रता ४५ ते ५४ टक्के राहील.
मध्य विदर्भ
आज (ता.२९) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २ ते ३ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात ताशी १५ किमी, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ताशी २० किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ६७ ते ७९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आद्रता ५१ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आज (ता.२९) चंद्रपूर जिल्ह्यात २ मिमी, भंडारा जिल्ह्यात ५ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात ६ मिमी आणि गोंदिया जिल्ह्यात ७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली जिल्ह्यात ताशी ७ किमी, गोंदिया जिल्ह्यात ताशी ९ किमी, तर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत ताशी ११ ते १३ किमी राहील. कमाल तापमान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आद्रता ८५ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आद्रता ६५ ते ७० टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज (ता.२९) सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत २ ते ३ मिमी, सातारा जिल्ह्यात ६ मिमी, सांगली जिल्ह्यात ८ मिमी, तर पुणे जिल्ह्यात ३८ मिमी आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५५ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात ताशी १५ किमी, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ताशी १७ ते १८ किमी आणि अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात ताशी २२ ते २३ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, तर सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील.
कृषी सल्ला
मूग, मटकी, चवळी, वाटाणा, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, बाजरी, ज्वारी, मका या पिकांच्या पेरण्या जमिनीत पुरेशी ओल असताना वाफसावर करावी.
पेरणी झालेल्या ठिकाणी बियाणे उगवण झाली नसल्यास तेथे बियाणे टोकावे. दाट उगवण झाली असल्यास विरळणी करावी.
भात रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
गोठ्यात पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.