Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : अल्प ते मध्यम पावसाची शक्यता

Rain Prediction : संपूर्ण आठवडाभर महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील हवेच्या दाबातही वाढ होत आहे. तसेच प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे.

Team Agrowon

Rain Update : संपूर्ण आठवडाभर महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील हवेच्या दाबातही वाढ होत आहे. तसेच प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे.

तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्राचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे हिंदी महासागरावरील वारे मोठ्या प्रमाणात प्रशांत महासागराकडे बाष्प वाहून आणतील. त्यामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील.

यंदाच्या १ जून ते २० सप्टेंबर या कालावधीतील पावसाचे प्रमाण पाहिल्यास त्या त्या जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. सद्यःस्थितीत नगर, जालना, बीड, सांगली व सातारा या ५ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ४१ ते ४६ टक्के कमी पाऊस झाला आहे.

तर सोलापूर, हिंगोली, अमरावती, परभणी, धाराशिव या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ३१ ते ३७ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर व वाशिम या दोन जिल्ह्यांत २३ ते २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. हवामान बदल व एल निनोचा प्रभाव या बाबींमुळे पावसावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागांत दुष्काळी स्थिती दिसून येत आहे.
कोकण
आज (ता. २५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात १३ मिमी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत १० मिमी, पालघर जिल्ह्यात १३ मिमी पावसाची शक्यता राहील. उद्या (ता. २६) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ६ मिमी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ७ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ११ मिमी पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७४ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता. २५) नाशिक जिल्ह्यात १२ मिमी, धुळे जिल्ह्यात ६ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात १ मिमी तर जळगाव जिल्ह्यात ६ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. २६) नाशिक जिल्ह्यात ८ मिमी, धुळे जिल्ह्यात ७ मिमी, नंदुरबार जिल्ह्यात ८ मिमी व जळगाव जिल्ह्यात १० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान ३० अंश व किमान २३ अंश सेल्सिअस सवर्च जिल्ह्यांत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील.
मराठवाडा
आज (ता. २५) धाराशिव जिल्ह्यात ६ मिमी, लातूर जिल्ह्यात ११ मिमी, नांदेड जिल्ह्यात १४ मिमी, बीड व परभणी जिल्ह्यांत २० मिमी, हिंगोली जिल्ह्यात २२ मिमी, जालना जिल्ह्यात १७ मिमी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. २६) धाराशिव जिल्ह्यात ४६ मिमी, लातूर जिल्ह्यात २९ मिमी, नांदेड जिल्ह्यात १६ मिमी, बीड जिल्ह्यात २८ मिमी, परभणी जिल्ह्यात १७ मिमी, हिंगोली जिल्ह्यात १२ मिमी, जालना जिल्ह्यात २६ मिमी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ मिमी पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत नैॡतेकडून तर बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ किमी राहील. कमाल तापमान बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील.

कमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात ३१ अंश, तर लातूर व नांदेड जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
आज (ता. २५) बुलडाणा जिल्ह्यात १२ मिमी, अकोला जिल्ह्यात १९ मिमी, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२६) बुलढाणा जिल्ह्यात २३ मिमी, अकोला जिल्ह्यात १५ मिमी, वाशीम जिल्ह्यात १९ मिमी तर अमरावती जिल्ह्यात ११ मिमी पावसाची शक्यता राहील.

वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ टक्के राहील.

मध्य विदर्भ
आज (ता. २५) यवतमाळ जिल्ह्यात १५ मिमी, वर्धा जिल्ह्यात १४ मिमी, नागपूर जिल्ह्यात १५ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. २६) यवतमाळ जिल्ह्यात २० मिमी व वर्धा जिल्ह्यात ८ मिमी, नागपूर जिल्ह्यांत ११ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात वायव्येकडून तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
आज (ता. २५) चंद्रपूर जिल्ह्यात ३२ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात १५ मिमी, भंडारा जिल्ह्यात २० मिमी आणि गोंदिया जिल्ह्यात १४ मिमी पावसाची शक्यता राहील. उद्या (ता. २६) चंद्रपूर आणि गडचिरोली  जिल्ह्यात १३ मिमी, भंडारा जिल्ह्यात १९ मिमी आणि गोंदिया २० मिमी पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून आणि वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील.

कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६५ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र
आज (ता. २५) कोल्हापूर जिल्ह्यात ४ मिमी, सांगली जिल्ह्यात २ मिमी, सातारा जिल्ह्यात ४ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ३ मिमी, पुणे जिल्ह्यात १२ मिमी तर नगर जिल्ह्यात १८ मिमी पावसाची शक्यता राहील. उद्या (ता.२६) कोल्हापूर जिल्ह्यात १२ मिमी, सांगली जिल्ह्यात ११ मिमी, सातारा जिल्ह्यात ६ मिमी, सोलापूर जिल्ह्यात २२ मिमी, पुणे जिल्ह्यात ५ मिमी तर नगर जिल्ह्यात ११ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग सांगली जिल्ह्यात २१ कि.मी., सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत १३ ते १४ कि.मी. तर उर्वरित जिल्ह्यात ९ ते ११ किमी राहील. कमाल तापमान नगर व सोलापूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर सांगली व पुणे जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ८० टक्के  राहील.

कृषी सल्ला
  मूग, उडीद, चवळी, मटकी या पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करावी.
  करडई व रब्बी ज्वारीची पेरणी वेळेत पूर्ण करावी.
  हरभरा पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
  भात खाचरात पाण्याची पातळी ५ सेंमीपर्यंत नियंत्रित करावी.
  विविध भागांतील पाऊस परिस्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलाव्यानुसार पेरणीचे नियोजन करावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT